- WEBSITE/MOBILE APP FEATURES -
01 | Complete accounts of housing societies can be maintained online on this website. | या वेबसाईटवर हौसिंग सोसायटी चे संपूर्ण अकाउंट्स ऑनलाईन पद्धतीने ठेवता येते. |
02 | The data of an Housing Society cannot be viewed or manipulated by anyone other than the person associated with that particular society. | एका संस्थेचा डेटा त्या संस्थेशी संबंधित व्यक्ती शिवाय इतर कुणीही पाहू शकत नाही अथवा हाताळू शकत नाही. |
03 | The following facilities are provided to the Accountant for Housing Society Accounts. First of all to login new society select the "Register" option to fill the required information of that society and save it by filling the required information, then you can start the accounting work of that society on the website by entering the password 12345 using the e-mail ID that the user has registered while filling the society information. - Preliminary information - 01. Creating a Society Profile. 02. Select the fiscal year. 03. Changing Group Heads. 04. Changing Account Heads. 05. Recording the opening balance. 06. Creating a brief Narrations and Save it. 07. Storing the names of banks in the Society Jurisdiction. | हौसिंग सोसायटी अकाउंट्स साठी अकाउंटंटला खालील सोई उपलब्ध करून दिलेल्या आहेत. सर्व प्रथम नवीन संस्थेचे लॉगिन करण्यासाठी त्या संस्थेची आवश्यक माहिती भरण्यासाठी रजिस्टर चा ऑप्शन निवड आणि त्यातील आवश्यक माहिती भरून ती सेव्ह करा. संस्था माहिती भरताना युझर ने जो ई-मेल आयडी नोंद केलेला असेल तो लॉगिन साठी वापरून पासवर्ड १२३४५ टाकून तुम्हाला वेबसाईटवर त्या सोसायटीचे अकाउंटिंग चे काम सुरु करता येईल. - प्राथमिक माहिती - ०१. सोसायटी प्रोफाइल बनविणे. ०२. आर्थिक वर्ष निवडणे. ०३. ग्रुप हेडस बदलणे. ०४. अकाऊंट हेडस बदलणे. ०५. आरंभीची शिल्लक नोंदविणे. ०६. थोडक्यात टीप तयार करणे व ती साठविणे. ०७. संस्था परिसरातील बँकांची नावे साठविणे. |
04 | The following facilities have been provided to store the information of the members of the Housing Society. Accountant of the Housing Society has to store all the necessary information of the members of the society on this website. But since some information is kept optional, it works even if it is not stored. Many housing societies have their accounts prepared and audited every year, but the following important records of the societies are not updated every year by the accountants. Here, however, the accountant has to update these records every year. - Important records of members - 01. Member "I" Register 02. Member "J" register 03. Member "Share" register 04. Member "Nomination" Register 05. Associate Members Register 06. Mortgage Register 07. Property Register | संस्थेच्या सभासदांची खालीलप्रमाणे माहिती साठविण्याची सोय करून दिलेली आहे. संस्थेच्या सभासदाची संपूर्ण आवश्यक माहिती संस्थेच्या अकाउंटंटला या वेबसाईटवर साठवावी लागते. मात्र काही माहिती ऑपशनल ठेवलेली असल्याने ती साठविली नाही तरी चालते. बऱ्याच गृहनिर्माण संस्थांचे प्रत्येक वर्षी अकाउंट्स तयार होतात आणि त्याचे ऑडिट होते, मात्र संस्थांचे खालील महत्वाचे रेकॉर्डस् अकाउंटंट्स कडून दरवर्षी अपडेट्स केले जात नाहीत. इथे मात्र अकाउंटंटला हे रेकॉर्ड दरवर्षी अपडेट करावेच लागतात. - सभासदांचे बाबत नोंदी होणारे महत्वाचे रेकॉर्डस् - ०१. सभासद "आय" नोंदवही ०२. सभासद "जे" नोंदवही ०३. सभासद "भाग" नोंदवही ०४. सभासद "वारस" नोंदवही ०५. सहयोगी सभासद नोंदवही ०६. मॉर्गेज रजिस्टर ०७. प्रॉपर्टी रजिस्टर |
05 | Accountant can proceed with accounting work on this website only after filling the preliminary information and necessary information of the members. At this place we have facilitated billing and it mainly includes the following items. - Monthly maintenance bill - 01. Creating a billing structure. 02. Storing unit-wise rates of billing. After the above information is stored by the accountant, the following items are created automatically. 03. Billing register 04. Billing summary 05. Personal burial 06. Print bills Here we have provided an additional task to the institution which is to record the resolution in which meeting the amount mentioned in the bill was passed. The reason for this is that no one can enter the amount in the bill without a resolution, there is a provision to file a suit in the Co-operative Court and if the resolution of the organization is approved, it cannot be challenged, according to Bombay High Court judgments. therefore 07. Resolution of bill amount Bill amount resolution is provided to every member on our mobile app. Every member can view his current month bill on mobile and pay it on our mobile app. Also, we have provided the facility of viewing all the bills of each member for the financial year and the details of all the amounts paid in that year on the mobile app. | प्राथमिक माहिती भरल्यानंतर आणि सभासदांची आवश्यक माहिती भरल्यानंतरच अकाउंटंटला या वेबसाईटवर अकाउंटिंग चे काम पुढे सुरु करता येते. या ठिकाणी आम्ही बिलिंग ची सोय करून दिलेली असून त्यात प्रामुख्याने खालील बाबींचा समावेश केलेला आहे. - मासिक मेंटेनन्स बिल - ०१. बिलिंग स्ट्रक्चर तयार करणे. ०२. बिलिंग चे युनिटवाईस दर साठविणे. वरील प्रमाणे माहिती अकाउंटंटने साठविल्यानंतर खालील बाबी आपोआप तयार होतात. ०३. बिलिंग रजिस्टर ०४. बिलिंग समरी ०५. वैयक्तिक खतावणी ०६. प्रिंट बिल्स इथे आम्ही संस्थेला एक वाढीव काम उपलब्ध करून दिलेले आहे ते म्हणजे बिलात नमूद रक्कमेचा कोणत्या सभेत ठराव संमत झाला त्या ठरावाची नोंद करणे. त्याचे कारण कि, ठरावाशिवाय कोणालाही बिलात रक्कम नोंदविता येत नाही, तसे केल्यास सहकार न्यायालयात दावा दाखल करण्याची तरतूद आहे आणि जर संस्थेचा ठराव संमत असल्यास त्याला आव्हान देता येत नाही असे मुंबई उच्च न्यायालयाचे निकाल आहेत. म्हणून ०७. बिल रक्कमेचे ठराव बिल रक्कमेचे ठराव प्रत्येक सभासदाला आमच्या मोबाईल ऍप वर पाहण्याची सोय करून दिलेली आहे. प्रत्येक सभासदाला त्याचे चालू महिन्याचे बिल मोबाईल वर पाहण्याची व ते पे करण्याची आमच्या मोबाईल ऍप वर सोय आहे. तसेच प्रत्येक सभासदाची आर्थिक वर्षाची सर्व बिले व त्या वर्षात पे केलेल्या सर्व रक्कमांचा तपशीलही मोबाईल ऍप वर पाहण्याची सोय आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे. |
06 | We have provided data entry facility for the following records for the Accountant of the Housing Society on the website. 01. Recording of cash receipts. 02. To record amounts deposited in the bank. 03. Recording cash Expenses. 04. Recording bank Expenses. 05. Recording of Journal Entries. 06. Checking the entries passed to the bank. (BRS) 06. Maintaining records relating to investment. 07. Maintaining records of Assets (Fixed/Current) | आम्ही वेबसाईटवर संस्थेच्या अकाउंटंट साठी खालील नोंदी साठी डेटा एन्ट्री ची सोय करून दिलेली आहे. ०१. रोखीच्या पावत्यांची नोंद करणे. ०२. बँकेत जमा झालेल्या रक्कमांची नोंद करणे. ०३. रोखीच्या खर्चाची नोंद करणे. ०४. बँक खर्चाची नोंद करणे. ०५. जर्नल एन्ट्रीज ची नोंद करणे. ०६. बँकेत पास झालेल्या नोंदी तपासणे. ०६. गुंतवणुकी संदर्भातील नोंदी साठविणे. ०७. मालमत्ते संदर्भातील नोंदी साठविणे. |
07 | After completing the complete data entry by the Accountant of the Housing Society, the following registers are generated automatically and can be printed or stored in PDF format. - Important Account Books - 01. First page with information about the society. 02. index 03. Cash Book 04. Cash Flow Statement 05. Bank book 06. Journal Book 07. General Ledger 08. Investment register 09. Property register | संस्थेच्या अकाउंटंटने संपूर्ण डेटा एन्ट्री पूर्ण केल्यावर खालील नोंदवह्या आपोआप तयार होतात त्यांची प्रिंट घेता येते अथवा ते पीडीएफ मध्ये साठवून ठेवता येतात. - महत्वाच्या हिशोबाच्या नोंदवह्या - ०१. संस्थेची माहिती असलेले पहिले पान ०२. अनुक्रमणिका ०३. रोजकीर्द ०४. कॅश फ्लो स्टेटमेंट ०५. बँक बुक ०६. जर्नल बुक ०७. सर्वसाधारण खतावणी ०८. गुंतवणूक नोंदवही ०९. मालमत्ता नोंदवही |
08 | After the complete data entry is completed by the Accountant of the organization, the following financial sheets are generated automatically, they can be printed or saved in PDF format. 01. Receipt and Payment Statement 02. Trial Balance 03. Income and Expenditure Account 04. Balance Sheet 05. Bank Reconciliation Statement Apart from this, the facility of uploading the following documents required for audit is provided on the website. (Currently Hidden) 01. List of Investments 02. List of Fixed/current Asset 03. List of members in Arrears 04. List of Members 05. List of Managing Committee 06. Bank balance Certificates 07. Accrued Interest Certificates For Housing Society's Annual General Meeting 06. Annual budget 09. Surplus Appropriation Every member is provided facility to view Receipt and Payment Statement, Trial Balance, Income and Expenditure Statement and Balance Sheet etc. on our mobile app. | संस्थेच्या अकाउंटंटने संपूर्ण डेटा एन्ट्री पूर्ण केल्यावर खालील आर्थिक पत्रके आपोआप तयार होतात त्यांची प्रिंट घेता येते अथवा ते पीडीएफ मध्ये साठवून ठेवता येतात. ०१. जमा व खर्च पत्रक ०२. ट्रायल बॅलन्स ०३. उत्पन्न व खर्च पत्रक ०४. ताळेबंद पत्रक ०५. बँक जुळवणी पत्रक याशिवाय ऑडिट साठी आवश्यक असलेले खालील दस्तावेज अपलोड करण्याची सोय वेबसाईट वर दिलेली आहे. (सध्या अदृश्य ठेवली आहे) ०१. गुंतवणुकीची यादी ०२. कायम/चालू मालमत्ता यादी ०३. थकबाकीदार सभासदांची यादी ०४. सभासदांची यादी ०५. समिती सदस्यांची यादी ०६. बँक बाकी दाखले ०७. येणे व्याजाचे दाखले सर्व साधारण सभेसाठी संस्थेकरिता ०६. वार्षिक अंदाजपत्रक ०९. उत्पन्न विभागणी प्रत्येक सभासदाला आमच्या मोबाईल ऍप वर ट्रायल बॅलन्स, उत्पन्न व खर्च पत्रक आणि ताळेबंद पत्रक इत्यादी पाहण्याची सोय करून दिलेली आहे. |
09 | There is facility to maintain daily records at society level. - Society Officer or Secretary/Treasurer - 01. Daily rough records of Housing Society can be maintained. 02. Information of members' mobile numbers and e-mail IDs can be stored 03. Information of active and non-active members can be stored. 04. A list of those whose membership is terminated in any manner is automatically generated. For example - In case of transfer of share due to sale of unit, In case of transfer of share due to death of member, In case of transfer of share due to any other reasons. | संस्था पातळीवर दैनंदिन नोंदी ठेवण्यासाठी सोय आहे. - संस्था पदाधिकारी अथवा सचिव/खजिनदार - ०१. संस्थेच्या दैनंदिन कच्या नोंदी ठेवता येतात. ०२. सभासदांचे मोबाईल नंबर्स व ई-मेल आईडी ची माहिती साठविता येते. ०३. सक्रिय व अ-सक्रिय सभासदांची माहिती साठविता येते. ०४. ज्यांचे सभासदत्व कोणत्याही प्रकाराने बाद होते त्यांची यादी आपोआप तयार होते. उदाहरणार्थ - युनिट विक्रीमुळे भाग हस्तांतर झाल्यास, सभासद मयतमुळे भाग हस्तांतर झाल्यास, अन्य कारणाने भाग हस्तांतर झाल्यास. |
10 | The housing society can upload the following records on this website in PDF format. - PDF documents can be saved - 01. Inward Letters/correspondence 02. Outward Letters/Correspondence 03. Members Share Certificates 04. Cash expenditure vouchers and bills 05. Bank expense vouchers and bills 06. Certificates of Investment 07. Property bills and receipts 08. Managing Committee Meeting Agenda 09. Managing Committee Meeting Minutes 10. Annual General Meeting Agenda 11. Annual General Meeting Minutes 12. Special General Meeting Agenda 13. Special General Meeting Minutes Apart from that, the Housing Society can upload the following important documents in PDF format on the website and all the members of the Housing Society can view the uploaded documents on the mobile app. 14. Society Registration Certificate 15. Form A and B of Society Registration 16. Building Plan 17. Occupation Certificate 18. Conveyance Deed 19. Structural Audit Report 20. Building Insurance 21. Entire Redevelopment Process Take a photo of the document on mobile, convert it to PDF and upload it to the website. | संस्थेला खालील रेकॉर्ड या वेबसाईटवर पीडीएफ नमुन्यात अपलोड करून ठेवता येतात. - पीडीएफ खालील दस्तावेज साठविता येतात - ०१. आवक पत्रव्यवहार ०२. जावक पत्रव्यवहार ०३. सभासदांची भाग प्रमाणपत्रे ०४. रोख खर्चाची व्हाउचर्स व बिले ०५. बँक खर्चाची व्हाउचर्स व बिले ०६. गुंतवणुकीची प्रमाणपत्रे ०७. मालमत्तेची बिले व पावत्या ०८. कार्यकारी मंडळ सभा विषय पत्रिका ०९. कार्यकारी मंडळ सभा इतिवृत्तांत १०. वार्षिक सर्वसाधारण सभा विषय पत्रिका ११. वार्षिक सर्वसाधारण सभा इतिवृत्तांत १२. विशेष सर्वसाधारण सभा विषय पत्रिका १३. विशेष सर्वसाधारण सभा इतिवृत्तांत त्याशिवाय संस्थेला खालील महत्वाचे दस्तावेज पीडीएफ नमुन्यात वेबसाईट वर अपलोड करून ठेवता येतील व असे अपलोड केलेले दस्तावेज संस्थेच्या सर्व सभासदांना मोबाईल ऍप वर पाहता येतील अशी सोय आहे. १४. सोसायटी रेजिस्ट्रेशन सर्टिफिकेट १५. संस्था नोंदणीचे अ व ब फॉर्म १६. इमारतीचा नकाशा १७. रहिवास दाखला १८. कॉन्व्हेयन्स डीड १९. स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट २०. बिल्डिंग इन्शुरन्स २१. संपूर्ण रिडेव्हलोपमेंट प्रक्रिया दस्तावेजांचे मोबाईलवर फोटो घ्यायचे ते पीडीएफ मध्ये कन्व्हर्ट करायचे आणि वेबसाईटला अपलोड करायचे. |
11 | The facility of uploading the complete information of the election process has been provided on our website and the said information should be uploaded on the website from time to time by the election officer during the Election Process of the Housing Society. We have made it possible for all the members to see that information on the Mobile App. - PDF documents of Election Process can be stored - 01. Preliminary List of Members (E-3) 02. Final List of Members (E-3(1)) 03. Election program 04. Candidature Application 05. List of Candidature Application Received 06. List of Eligible Candidates after Scrutiny 07. List of candidates who withdrew from the Election 08. Final list of Contesting Candidates 09. Sample Ballot Paper 10. Election Results (E-9) 11. Election Results (E-17) 12. Minutes of the meeting where the election results were declared 13. Minutes of the first meeting of the elected committee 14. Election report submitted to Deputy Registrar's office If there is any mistake in the election, the complaint goes to the Cooperative Court and the Election Returning Officer also has to become an innocent party as a result of which they have to fight the court and they get only 3500.00 if the election is uncontested and 7500.00 if the election is held, so this whole process is important. | आपल्या वेबसाईट वर निवडणुकीची संपूर्ण माहिती अपलोड करण्याची सोय दिलेली असून सदरची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने हौसिंग सोसायटीची निवडणूक प्रक्रिया सुरु असताना वेळोवेळी प्रत्येक टप्याची माहिती वेबसाईट वर अपलोड करावयाची आहे. ती माहिती सर्व सभासदांना मोबाईल ऍप वर बघण्याची सोय आम्ही करून दिलेली आहे. - निवडणुकीचे खालील पीडीएफ दस्तावेज साठविता येतात - ०१. सभासदांची प्राथमिक यादी (इ-३) ०२. सभासदांची अंतिम यादी (इ-३(१)) ०३. निवडणूक कार्यक्रम ०४. उमेदवारी अर्ज ०५. प्राप्त उमेदवारी अर्जाची यादी ०६. छाननी अंती पात्र उमेदवारांची यादी ०७. निवडणुकीतून माघार घेतलेल्या उमेदवारांची यादी ०८. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी ०९. नमुना मतपत्रिका १०. निवडणूक निकाल (इ-९) ११. निवडणूक निकाल (इ-१७) १२. निवडणूक निकाल जाहीर केलेल्या सभेचे इतिवृत्त १३. निवडून आलेल्या समितीच्या पहिल्या सभेचे इतिवृत्त १४. निवडणूक अहवाल उपनिबंधक कार्यालयास सादर निवडणुकीत कोणतीही चूक झाल्यास त्याबाबत तक्रार सहकार न्यायालयात होते आणि त्यात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यास देखील नाहक पक्षकार व्हावे लागते परिणामी त्यांना कोर्टाच्या खेपा माराव्या लागतात आणि त्यांना यासाठी मिळतात फक्त ३५००.०० जर बिनविरोध निवडणूक झाली तर आणि ७५००.०० जर निवडणूक झाली तर त्यामुळे हि संपूर्ण प्रक्रिया महत्वाची आहे. |
12 | The housing society can upload agendas of meetings and minutes of meetings on our website. All the members are given the facility to view the agenda and minutes of the general meetings on mobile phones and the agenda and minutes of the Managing Committee are only available to the members of the Managing Committee of the Housing Society on their mobile phones. We provide free guidance to every Housing Society regarding agendas and minutes of meetings. | संस्थेला सभांची विषय पत्रिका व सभांचे इतिवृत्तांन्त आमच्या वेबसाईटवर अपलोड करून ठेवता येतात. सर्वसाधारण सभांची विषय पत्रिका व इतिवृत्तांत सर्व सभासदांना मोबाईल वर पाहण्याची सोय दिलेली असून कार्यकारी मंडळाची विषय पत्रिका व इतिवृत्तांत फक्त संस्थेच्या कार्यकारी मंडळ सदस्यांनाच मोबाईल वर पाहण्याची सोय दिलेली आहे. सभांची विषय पत्रिका व इतिवृत्त बाबत प्रत्येक संस्थेला आमच्या कडून मोफत मार्गदर्शन दिले जाते. |
13 | Statutory auditors appointed by the Housing Society can check all the documents of the Housing Society on our website and they can save their statutory audit report remarks on time as well as upload the audit report and O form. | संस्थेने नेमलेल्या वैधानिक लेखापरीक्षकांना संस्थेचे सर्व दस्तावेज आमच्या वेबसाईट वर तपासता येतील व त्यांना वेळच्यावेळी आपला वैधानिक लेखापरीक्षण अहवाल नोंदविता येईल तसेच त्यांना ऑडिट रिपोर्ट व ओ फॉर्म अपलोड करून ठेवता येईल. |
Last updated: 26th April, 2024
Visit our Website : https://webaccsolution.com
Visit our Online Accounts Website : https://webaccsolution.com
Visit our Android Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.societymanagement.society_management&pcampaignid=web_share
Visit our Business Plan Website (only for our Special Members) : https://webaccsolution.in